Monday, July 6, 2020

बोल ना आई


बोल ना आई
अग आई तुझ्या पडत्या श्वासा बरोबर आठवणींचा पाऊस पडू लागला, डोळे भरून आले होते पण चित्र डोळ्यापुढे स्पष्ट दिसत होते.
त्या भकास चेहर्यातमी माझी हसरी आई शोधत होतो पण संथ श्वास त्या हास्याला दिसू देत नव्हतं.
तुझे डोळे मला बघत होतेपण मी त्यात नव्हतो जणू लहानपणीची लपाछपी.
मध्येच थांबणारा श्वास मला लहानपणी इजा झाली की जसा थांबायचा तसाच वाटला आणि ह्यावेळी देखील तुलाच त्रास झाला.
तुझा हात जसा माझ्या डोक्यावरून नेहमी प्रेमाने फिरायचा तसा मी प्रयत्नही केला...ना जाणे मला का वाटले की तू आनंदलिस.
डोळे परत भरून आले आणि नकळत हात तुझ्या पदराकडे वळला, पण कुठे होता तो?
सर्वात जास्त माया माझ्यावर केलीस.
लहानपणी आई अशी साद घातली की तुझी नजर चटकन मला टिपायची, पण आज, तुझी नजर शुन्यात होती. बघितलस पण जणू निरोप घ्यायच्या हेतूने.
एकदा...बोल ना आई.

No comments:

Post a Comment