ओढ
चांदणे वळले कुशीवर झाली पहाट
स्वप्नाच्या पाठीवर आली पहाट.
आता आहे इंतेजार सांज वेळाची
तुझी भेट होण-रया वेळेची.
सांज वेळी धुंद झाला मोगरा
आठवण करून देई कोणाचीतरी हा मोगरा.
हवा चिंब झाली अन आठवण कोणाचीतरी झाली.
प्रेमाची ओढ लागली जीवाला
कधी भेटशील असे झाले जीवाला
काय करू, प्रेमाने भिजला तरी प्यासा
समजावू कसे ह्या जीवाला.
एक कवडसा
अंधारातून डोकावतो जणू तुझे प्रेम मध्येच
मला गोंजारते
एक कवडसा अंधारातून डोकावतो म्हणतो थांब, प्रेमाचे दिवस लवकरच भरभरून
येतील.
एक कवडसा ऊन्हाचा अंगावर पडतो आणी तुझ्या
उष्ण श्वासाची आठवण करून दतो.
एक किरण उन्हाची जेव्हां सकाळी दिसते तेंव्हा
तुझा चेहरा बघितल्याचा भास होतो जणू.
एक कवडसा दिसताच आशा वाटते….जगण्याची एकमेकांच्या
सोबतीने.
No comments:
Post a Comment