Sunday, July 5, 2020

सखी आणी स्वप्न


सखी
सखे तुझ्याशी हितगुज करताना मिळतो आनंद
जवळ असताना मिळतो अतीआनंद
प्रेम करताना मिळतो परमानंद !
मनात असतेस सारखी, ह्रदयात वसतेस,
स्वप्नात भेटेन असे वाटते, पण तूझी याद झोप उडवते आणी स्वप्न पडतच नाही.
स्मित हास्य करतेस जेव्हां, पटकन जवळ घ्यावेसे वाटत् तेव्हं.
हमम...करतेस हळुच जेव्हां, मन घायाळ होते तेव्हां, खिडकीत माझी वाट पाहतेस तेव्हां, माझे कोणी आहे असे वाटते तेव्हां !!


स्वप्ना नंतर
लेखणीतून माझ्या शब्दं हरवत गेले
हळू हळू तेही मला विसरत गेले
जेव्हां मी उघडले डोळे
पापण्यातील पाणी चमकून माझे स्वप्न मला रडवून गेले.
कवि जागा झाला तुझ्या प्रेमात
कल्पना कवीची तू, दरवेळी वेगळी वाटते प्रेमात,
कवितेत भिडल्याशिवाय काय मजा आहे प्रेमात.
ताज्या फुला सारख्या तुझ्या चेहर्याचे दर्शन झाले
डोळे पाकळ्यांपरी ओठांवर थमले, रस पिऊन बेहोश व्हावेसे वाटले
तुला कवेत घेऊन कुबळावेसे वाटले
पण काय करतो बापडा, नुसते कवितेने समाधान मानले.

No comments:

Post a Comment