तू
अशी जवळी रहा
❤.
तुला पाहिले मी पाठीवर केस मोकळे सोडूनी
मन क्षणभर भरकटले सर्व फिक्र सोडूनी !
झटकत ओले केस मान वळवून
वाटले जावे आणी ध्यावे जवळ कवळून !!
नहालेले ताजे सौंदर्य उष्ण शरीर
डोळे खिळले, मन स्पर्श करीत होते त शरीर
अलगद अलगद हळूवार हळूवार,
तेवढ्यात वर होऊन नाजूकसा आळस दिलास.
केस मागे, वर झालेले वु्रक्षस्थळे, मिटलेल्या पापण्या…..जीवाला हरवून टाकणारे !
हरवलो, श्वासोश्वास वाढला आणी तुझा आळस
संपायच्या आत पोचलो तुझ्या मीठीत !!!
दूरवर गाणे ऐकू येत होते…..तू अशी जवळी रहा ❤.
No comments:
Post a Comment