Wednesday, October 25, 2023

बदललेले जग, उतार वयात !

 

बदललेले जग, उतार वयात!

निवृत्तीचा आभास स्वतःला नाही होत

निवृत्तीची जाणीव दूसरे करुन देतात!

घरी बसून आठवणींच्या जगात रमत असतो,

विरंगुळा म्हणून कविता करणे पण आता फरक असतो कवितेच्या शब्दात,

आधी प्रेम आनंद असे तर आता एकटेपणाचा भाव असतो.

सगळे आपापल्या संसारात कामात मग्न,

तर माझ्या हाताला काम नाहीं जोडीला कोणच नाही.

चेहरे आणि मुखवटे आठवतात,

आपला एक चेहरा त्यावर हसरा मुखवटा !

उगीच बाहेर निघतो पण कशाला हे अनेकदा माहीत नसते,

 वेळ घालवणे हेच डोक्यात असते.

शून्य विचार डोक्यात असणं काय असतं ह्याची प्रचिती येते,

कोणा बरोबर कधी संवाद झाला हे पटकन आठवत नाही बहुतेक खूप दिवस झाल्याची प्रचिती येते.

घरात फेऱ्या मारुन पाय दमतात, डोळ्यात अश्रू येतात, घड्याळ डोळे अनेकदा बघतात पण वेळ पुढे सरकत नाही‌‌, आठवणींच्या जगात बहुधा वेळ थांबलेलाच असतो!


 

No comments:

Post a Comment